दुकानदारी बंद झाल्याने भाजप आमदार व पदाधिकाऱ्याकडून शहरवासीयांची दिशाभूल; प्राधिकरण विलीनीकरण वरती राष्ट्रवादीकडून भाजपवर पलटवार
प्राधिकरण विलिनीकरणाच्या शासन निर्णयात सर्व बाबी शासनाने स्पष्ट केल्या

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे महापालिकेत व पीएमआरडीएमध्ये विलिनीकरणामुळे शहराचे कोणतेही नुकसान झाले नाही. यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचा फायदाच होणार आहे. यामधून अनेक प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहेत. मात्र, या निर्णयामुळे भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांची दुकानदारी बंद होणार असल्याने पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची दिशाभूल करत आहेत. राज्य सरकार विरोधात टीका करून आरोप करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरै पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, अजित गव्हाणे, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.
प्राधिकरण विलिनीकरणाच्या शासन निर्णयात सर्व बाबी शासनाने स्पष्ट केल्या आहेत परंतु ते समजून न घेता चुकीचे आरोप भाजपने केले आहेत. नागरिकाचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे प्राधिकरणाचे प्रलंबित प्रश्न निकाली निघतील ही घरे नागरिकांच्या मालकीची होणार असून बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे. यासह प्राधिकरण सोवर महापालिकेचे महापौर स्थायी अध्यक्ष व आयुक्तही असणार आहे त्यामुळे यामध्ये शहराचे कोणतेही नुकसान झालेले नाही, भाजपचे पदाधिकारी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहे.
यामुळे शहराविसायाचे नुकसान होणार नसू । भाजपच्या आमदारांची दुकानदारी बंद होणार आहे. प्रशासनाकडे प्राधिकरण असताना ज्यांनी हित साधले संधी साधून भागिदारी केले ही संधी गेल्याने ते हैराण आहेत दुकानदारी बंद झाल्याने नैराश्यातून आरोप करत आहेत. प्राधिकरणाला मिळणाऱ्या ठेवी व जमिनींचा पैसा पीएमआरडीला देण्याचा आरोप बिनबुडाचा आहे उलट आतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी शासनाचा निधी शहरात येणार आहे. त्याचा फायदा शहरालाच होणार आहे आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकायांनी केली आहे.
विलनीकरणातून शहरवासियांची ससेहोलपट थांबणार
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकानी २०१७ मध्ये मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात सत्ता दिली होती. मात्र, तरीही राज्य आणि शहरातील कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, साडेबारा टक्के परताव्याचे प्रश्न जैसे थे आहेत. याबाबत दिलासा देण्याचे काम वेळोवेळी आघाडी सरकारच्या काळात झाले. उलट भाजपच्या काळात शहरातील नागरिकाची ससेहोलपट झाली आहे. विलिनीकरणातूनही शहरवासीयांची ससेहोलपट थांबणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.