लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

जागतिक योगदिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये योग शिबिरांचे आयोजन – आमदार महेश लांडगे

शहरातील भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी होणार

lokvarta

लोकवार्ता।प्रतिनिधी

पिंपरी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी २१ जून रोजी योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील २ हजार ७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबिरांचे कार्यक्रम होणार आहेत. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्येही या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

http://silversakshi.in/
http://silversakshi.in/

याबाबत आमदार लांडगे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन सिद्ध झाले असून भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास २०० देशांनीही स्वीकारली आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते. त्यामुळे आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद प्रभागांत पक्ष कार्यकर्त्यांद्वारे किमान दोन योग शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. असून सार्वजनिकरीत्या आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्येही पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

योगविद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी सहभागी होणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सर्वजण योग शिबिरातील किंवा वैयक्तिक योगसाधनेची छायाचित्रे व व्हिडियो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणार असून राज्यभर योगदिनाच्या उत्साहाचे अभूतपूर्व दर्शन घडवितील. भारताला हजारो वर्षांची योगाभ्यासाची परंपरा असल्याने या दिवशी जगभर योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला व जगातील सुमारे २०० देशांनी तो स्वीकारला. एकाच वेळी जागतिक पातळीवर साजरा होणारा योग दिन हा अलीकडच्या काळातील वैश्विक सहमतीचे प्रतीक ठरला असल्याने, योगाभ्यासाचा जनक असलेल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

२५ जून आणीबाणीविरोधी काळा दिवस…
स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच, राज्यात जिल्हा स्तरावर भाजपाच्या वतीने व्हिडियो कॉन्फऱन्स, पत्रकार परिषदा व समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणीवा समाजास करून देण्यात येतील. या माध्यमातून युवा पिढीला आणीबाणीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या झालेल्या गळचेपीची माहिती देण्यात येईल, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani