राष्ट्रवादी काँग्रेस कडून भूमिपूजन करण्यात आलेल्या जागेचे भाजपकडून शुद्दीकरण
राष्ट्रवादीच्या हस्ते काल हे भुमीपूजन झाल्याने सदरची जागा अपवित्र झाली -बाळा भेगडे.
पिंपरी । लोकवार्ता
तळेगाव दाभाडे येथील विविध कामांचे भुमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. मात्र भुमीपूजन झालेल्या नगरपरिषदेच्या या जागेचे भाजपन गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले.मावळ गोळीबाराला कारणीभूत अजित पवारांच्या हस्ते सदर भुमीपूजन झाल्याने त्या जागेचे शुद्धीकरण केले, असे शुद्धीकरण करणारे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.

पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेला विरोध करणाऱ्या मावळातील शेतकऱ्यांवर ९ ऑगस्ट २०११ रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला, तर ११ जण जखमी झाले होते. त्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कारणीभूत असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यांच्या हस्ते काल हे भुमीपूजन झाल्याने सदरची जागा अपवित्र झाली होती. म्हणून तिचे शूद्धीकरण केले. यातून कालच्या कार्यक्रमाचा निषेध केला, असे भेगडे म्हणाले.