“महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला कार्यकर्त्यांनी केला मेट्रो प्रवास”
पुणे | लोकवार्ता-
राज्यभरात जागतिक महिला दिनाचा उत्साह दिसून येतोय. महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पुण्यातही महिला दिनाचा उत्साह आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मेट्रोत प्रवास करुन महिला दिन साजरा केला. महिला कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साहाचं वातावरण दिसून आलं.

पुण्यातही पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मेट्रोत प्रवास करुन महिला दिन साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येनं महिलांना मेट्रोचा प्रवास केला. महिला कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साहाचं वातावरण दिसून आलं. पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी देखील सकाळी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. यावेळी महिला कार्यकर्त्यांची मेट्रोमध्ये गर्दी दिसून आली.महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पुण्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना मेट्रो प्रवास करुन महिला दिनाला विशेष बनवलं. आज महिला दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात असताना पुण्यात आज मोफत प्रवास ठेवल्याने महिलांची मोठी गर्दी दिसून आली. जागतिक महिला दिनी पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो प्रवास करुन साजरा केला.