पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे चक्काजाम आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने ओबीसी आरक्षणासाठी चक्काचाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुणे-मुंबई जुना महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमा झाले आहेत.

दरम्यान, ‘ओबीसी’ आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पुण्यातील शाहु कॉलेज येथे छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.