भाजपची वाटचाल ‘यू ट्यूब’ वर
‘कुछ यादें कुछ मुलाकातें’

लोकवार्ता । प्रतिनिधी
लोकसभेत दोन खासदार ते पूर्ण बहुमतासह सत्ता, असा भारतीय जनता पक्षाचा प्रवास आहे. या काळात हिंदुत्व या विचारधारेवर ठाम राहात या पक्षाने घोडदौड केली. अनेक संघर्षाचे प्रसंग पक्षाने अनुभवले प्रभावी नेते घडविले. त्याचा प्रवास आता कुछ यादें कुछ मुलाकातें’ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भाजप प्रेमींसमोर येणार आहे.

VIDEO : https://fb.watch/7rtwwp76uy/
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या चॅनेलचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित अनेक आठवणी, संघर्षाचे प्रसंग, सभा दौऱ्या या दरम्यानचे अनुभव पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची ओळख या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांना करून दिली जाणार आहे. नड्डा म्हणाले, “असंख्य कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष योगदानामुळे पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकला आहे. त्या कार्यकर्त्यांची निष्ठा आणि योगदान या चॅनेलमुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचेल आणि नव्या कार्यकर्त्यांनाही यातून प्रेरणा मिळेल. “