लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भाजपचा विजय, महाविकासआघाडीला मोठा धक्का

-अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा विजय.

पिंपरी | लोकवार्ता-

नागपूर विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा बहुमताने विजय झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ४९ मतं फुटली आहेत. भाजपानं या निवडणुकीत यशस्वी खेळी खेळली असून त्याचा फटका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बसला आहे.

भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली.

विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani