मोशीत गणेश साहेबराव सस्ते पाटील यांच्या वतीने रक्तदान शिबीर व नौकरी महोत्सवाचे आयोजन
-अमोल कोल्हे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
मोशी । लोकवार्ता-
मोशी येथे सर्वप्रथमच तरुणवर्गासाठी नौकरी महोत्सवाच्या शिबिराचे आयोजन, गणेश साहेबराव सस्ते पाटील व जगद्गुरू प्रतिष्ठाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भोसरीचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर व नौकरी महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचे सस्ते यांनी सांगितले.

या शिबीराचे उद्घाटन, राष्ट्रवादी पक्षाचे शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हास्ते तर पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य नेत्यांनी येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये गणेश सस्ते यांना मोशी परिसराचा अधिका अधिक कायापालट करण्यासाठी त्यांना महापालिका सभागृहात पाठवून स्वा करण्याची संधी देण्यात यावी, असा सुर कार्यकर्त्यांतुन येत होता.

या कार्यक्रमाला उपस्थिती पिंपरी चिंचवड शहराच्या महीला अध्यक्षा कविता आल्हाट व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका मंदाताई आल्हाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वसंत बोराटे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते छत्रपतींच्या पुजन व दिप प्रज्वलित करून या कार्यक्रमाला सुरवात झाली. मोशी नवीन देहु आळंदी रोड ला लगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर नेते गणेश साहेबराव सस्ते पाटील यांच्या कार्यालया समोर रक्तदान शिबीर व नौकरी महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला १०० + रक्त दात्यांनी रक्त दान केले तसेच नौकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी ३५ पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवास देखील १५० पेक्षा अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदविला. या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.