नगरसेवक तुषार हिंगे यांच्या वतीने आयोजित शिबिरात १९० जणांचे रक्तदान
रक्तदान केल्याने रूग्णांचे प्राण वाचवू शकतो

लोकवार्ता|प्रतिनिधी
पिंपरी : रक्त हा शरीराचा अविभाज्य घटक आहे. संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषण व ऑक्सिजन देण्याचे काम रक्तद्वारे होते.

रक्तदान केल्याने गरीब व गरजूंचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी रक्तदान शिबिर घेण्याची गरज आहे, असे मत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबिराचे संभाजीनगर, चिंचवड येथे घेण्यात आले. त्यात तब्बल १३० जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होते.

आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक केशव घोळवे, मा.नगरसेवक राजुदुर्गे, मा.नगरसेवक मधुकर शेठ बाबर, मा.नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली हिंगे, रौद्र शंभो प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संदीप थोरात, श्रीकांत देसाई, संभाजी बालघरे, विक्रम जानूगडे, अमित देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संघर्ष मित्र मंडळ,रौद्र शंभो प्रतिष्ठाण,सह्याद्री प्रतिष्ठाण या सर्वांच्या सहकार्यने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
