लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

ब्रेकिंग न्यूज : मंत्रिमंडळ विस्तारावर आजच शिक्कामोर्तब?

लोकवार्ता : महाराष्ट्राच्या दृष्टीने या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी हाती येऊ शकते.

मंत्रिमंडळ

राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेल्या इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत. शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा समावेश आहे. मंत्रिपदाचं आश्वासन मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडूही खातेवाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. तर भाजपच्या गोटातून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.

uddhav thackeray पक्षप्रमुख पदावरून पायउतार ? | लोकवार्ता

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंबंधीची महत्त्वाची बैठक आज दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात होत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत काढण्यासंबंधी रणनीती आज ठरवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी साखर उद्योगातील महत्त्वाचे भाजप नेते दिल्लीत उपस्थित आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक आहे. अमित शाह यांच्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

या आमदारानं भाजपला चितपट करून राष्ट्रवादीचा डंका वाजवला । #sunilshelke

राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर शिवसेना पक्षाविषयी महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्ट तसेच निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. या सुनावणीतील घडामोडींनुसार, मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही म्हटले जात होते. मात्र आज दिल्लीतील बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani