लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

चांदणी चौकातील पूल पडणार; ‘असे’ असतील वाहतूक बदल

लोकवार्ता : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार असल्याने 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत किंवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

वाहतूक बदल

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा पूल पाडण्यात येणार असल्याने सदरचे काम करतेवेळी व तेथील राडाराडा उचलण्याची कारवाई होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तिथून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार आहे. साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापुर टोल नाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते उर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते घोडावत चौक (पिंपरी चिंचवड आयुक्तालय) या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग (Chandani Chowk Update) पुढीलप्रमाणे –

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनासाठी मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चार चाकी वाहने उर्से टोलनाका येथून जुन्या पुणे मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती हॉस्पिटल चौक, खंडूजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरून विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजी बाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदा मार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले डावीकडे वळून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग.

खेड शिवापुर टोल नाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग.

खेड शिवापुर टोल नाका शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगाव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डीपी रोड मार्गे नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग.

खेड शिवापुर टोल नाका शिंदेवाडी जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगाव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरून औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani