बुधवार पेठ व आयडियल कॉलनी स्थानकाचे नाव बदलून कसबा पेठ व पौड फाटा केले जाण्याची शक्यता
-‘भोसरी मेट्रो’ स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आल्यानंतर नावे बदलण्याचा निर्णय.
पिंपरी । लोकवार्ता-
शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर पुणेकर नागरिकांनी आयडियल कॉलनी’ व ‘बुधवार पेठ’, ‘भोसरी मेट्रो’ स्थानकांच्या नावाला आक्षेप घेण्यात आला होता. स्थानकांच्या नावानुसार संबंधित ठिकाण मेट्रो स्थानकांपासून बऱ्याच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडेल. असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुखकर वाहतूक सेवेसाठी ज्या ठिकाणी मेट्रो स्थानक आहे, त्याच ठिकाणचे स्थानकाला नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. तसाच प्रस्तावही महामेट्रोक प्रशासनाला देण्यात आला होता.

शहरात महामेट्रो प्रकल्पाचा पहिल्या टप्पयातील टप्पा सुरु झाला आहे. पुणेकर नागरिकांनाही मेट्रोच्या या सेवेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मट्रो स्थानकांपैकी महत्त्वाची स्थानके ओळखल्या जाणाऱ्या ‘आयडियल कॉलनी’ व बुधवार पेठ’ व ‘भोसरी मेट्रो’ स्थानकांच्या नावाला नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. या स्थानकांची नावे बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यानुसार बुधवार पेठ व आयडियल कॉलनी स्थानकाचे नाव बदलून अनुक्रमे कसबा पेठ व पौड फाटा केले जाण्याची शक्यता आहे. या संबधीचा प्रस्ताव राज्य सरकारसह केंद्राकडेही पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकांची नावे बदलण्याची आधीसूचना काढण्यात येणार आहे. मात्र जोपर्यंत प्रस्तावास मान्यता मिळत नाही तोपर्यंत नावे बदलता येणार नसल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.