पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयाने गेल्या सहा महिन्यात 2,214 बुलेटवर 22.14 लाख रुपये दंड केला वसूल | bullet bike
लोकवार्ता : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयाने गेल्या सहा महिन्यात 2,214 बुलेटवर 22.14 लाख रुपये दंड वसूल केला आहे. बरेच बुलेट वाहन चालक त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करतात. ज्यामुळे कर्णकर्कश आवाज येऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. यामुळे ध्वनी प्रदूषण होते. तसंच आजारी, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना यांना या आवाजाचा जास्त त्रास होतो. यामुळे नागरिक अशा वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी करत असतात.

आयुक्तालायच्या वाहतूक ज्ञाखेकडून बुलेट वाहन चालकांनी त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल केल्याने. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने जानेवारी ते जून 2022 पर्यंत अशा वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दांडात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे नियम भंग करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांकडून 1,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यात वसूल केलेला दंड :
- जानेवारी – 412 वाहन चालकांवर कारवाई – 4.12 लाख रुपये दंड
- फेब्रुवारी – 201 वाहन चालकांवर कारवाई – 2.01 लाख रुपये दंड
- मार्च – 123 वाहन चालकांवर कारवाई – 1.23 लाख रुपये दंड
- एप्रिल – 513 वाहन चालकांवर कारवाई – 5.19 लाख रुपये दंड
- 5.मे – 413 वाहन चालकांवर कारवाई – 4.19 लाख रुपये दंड
- 1 जून ते 29 जून महिन्यात 540 वाहन चालकांवर कारवाई करून 5.40 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
- गेल्या 6 महिन्यात 1 जानेवारी ते 29 जून 2022 वाहतूक विभागाने 2,214 बुलेट वाहन चालकांवर कारवाई करून 22.14 लाख रुपये दंड वसूल केला…