“मोशीत छटपूजा उत्सव कोरोनाचे नियम पाळून संपन्न”
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपूजेनिमित्त इंद्रायणी नदी तीरावर गंगा आरती.
पिंपरी| लोकवार्ता-
मोशी मध्ये छठ पूजेचा उत्सव कोरोनाच्या सर्व नियमाचे पालक करून पार पाडण्यात आला. आपले कुटूंबाच्या कल्याणासाठी उत्तर भारतीय महिला समर्पण भावनेने सूर्य देवतेची उपासना करीत छटपुजेचे व्रत मनोभावे करतात. बुधवारी विश्व श्रीराम सेना या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी (दि. 10 नोव्हेंबर) सायंकाळी गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार महेश लांडगे, शिवभक्त मिलिंद एकबोटे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे महाराष्ट्र सदस्य अर्जुन गुप्ता, विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, छठ पूजा समिती सदस्य, राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अरुण टाक तसेच विनोद गुप्ता, रोहित गुप्ता, गोदावरी महाविद्यालयाच्या प्राचार्य कुसुम गुप्ता आणि भक्त भाविक, महिला भगिनी उपस्थित होत्या.

विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपूजेनिमित्त इंद्रायणी नदी तीरावर गंगा आरती आयोजित करण्यात आली होती.
