“भाजपची ऑडिओ ब्रिज द्वारे मोर्चे बांधणी”
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बूथ प्रमुखांपासून नगरसेवकांपर्यंत १ हजार ७४० पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद.
पिंपरी।लोकवार्ता-
दिपावलीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी एकाच वेळी तब्बल १ हजार ७४० सहकाऱ्यांशी संवाद साधला. ऑडिओ बिज’द्वारे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांशी साधला संवाद..चंद्रकांत पाटलांनी मागील वर्षाची कोरोना परिस्थितीचा आढावा सांगत महापालिका निवडणूक जवळ आल्या असून आपल्या पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. कोरोना संकटाला सामोरे जाऊन आपण नवीन सुरुवात करूयात. गेल्यावर्षी कोरोना महामारीचे संकट आपल्यावर ओढवले. यामध्ये अनेक माझे बांधव,निकटवर्ती मला सोडून गेले. अनेकांच्या कुटुंबातील आधार गेले. देशात बेरोजगारी निर्माण झाली अनेक जणांचा तोंडचा घास हिरावला मात्र, आता हा अंधकार बाजूला सारून आपल्याला पुढे चालायचे आहे, असे आवाहनही भाजप आमदार लांडगे यांनी केले.
संवाद सेतूमध्ये , उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे,महापौर उषा उर्फ माई ढोरे, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, बाबू नायर आदी सहभागी झाले.