पवारसाहेबांना लक्ष घालावे लागते ,म्हणजे आम्हाला हरविणे सोपे नाही
शरद पवार, अजित पवार या दोन पवारांच्या बरोबर आ. रोहित पवार, खा. अमोल कोल्हे शहरात येतात त्यामुळे याठिकाणी आम्हाला हरविजे सोपे नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.
पिंपरी।लोकवार्ता –
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर शहरातील दोन्ही आमदारांच्या कारभारावर भाजपच्या नगरसेवकानेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबत बोलताना आ. पाटील म्हणाले की पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सक्षम आहे. दोन्ही आमदार आणि भाजपचे नगरसेवक व्यवस्थित आहेत. जे कोणी ४ नगरसेवक पक्ष सोडून जातील त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.
पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षाला एसीबीने अटक केली. त्याबाबत किरीट सोमय्या काहीच बोलत नाहीत. इतर प्रश्नासाठी ते इतर ठिकाणी जातात. मग ते या प्रश्नासाठी ते येणार का,असा प्रश्न केल्यानंतर एसीबी कोणाच्या
अखत्यारीत आहे. तर महाविकास आघाडीच्या. त्यांनी याबाबत पाठपुरावा करावा. असे म्हणता चेंडू त्यांनी महाविकास आघाडीकडे ढकलला.

“पूर्ण भारत एक आहे. ही आमची विचारधारा आहे.आम्ही त्याच्याशी फारकत घेऊ शकत नाही. आमची युती समविचारी पक्षाशी होते.संभाजी ब्रिगेडने त्या-त्या वेळी मांडलेल्या मतांची एकवाक्यता होणे शक्य नाही. मनसेसोबत युती होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची परप्रांतीयबाबतची भूमिका भाजपला मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्हाला कंट्रोल करत नाही. पण, आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यामुळे त्या विचाराशी थेठपणे विरोधाभास असे आम्ही करू शकत नाही”
महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही, मात्र शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका आला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर बोलतात. या सर्व प्रकरणामागील पाळंमुळे काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही, असेही पाटील म्हणाले.