भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहू कामाचा आढावा ; पंतप्रधानाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु
लोकवार्ता : येत्या १४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री क्षेत्र देहू मध्ये येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहू कामाचा आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी या संबंधित कामाचा आढावा घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्याच्या सूचना उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वारकरी येतील. त्यामुळे कार्यक्रम सुव्यवस्थित पार पडावा यासाठी सूचना दिल्या.

यावेळी प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, आ. राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आशाताई बुचके, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आजपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद; पंतप्रधान येणार देहू भेटीला…