चंद्रकांत नखाते यांची भाजपा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड
लोकवार्ता : रहाटणीचे नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते यांची आज (दि. 20 ) भाजपा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चंद्रकांत नखाते यांची या पदासाठी निवड केली आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर चिंचवडच्या राजकारणाला वेगळे वळण आले आहे. लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत नखाते यांचे भावी आमदार पदासाठी नाव घेतले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.