धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित तुळापूर ग्रामस्थांनी वाहिली आदरांजली
लोकवार्ता : आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निम्मित तुळापूर ग्रामस्थांनी आदरांजली वाहिली. ग्रामपंचायत श्री क्षेत्र तुळापूर आणि शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने तुळापूर येथील समाधी स्थळाजवळ नतमस्तक होत आदरांजली अर्पण करण्यात अली आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कमी आयुष्यात खूप मोठा पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्याची गाथा आज प्रत्येकाच्या नसानसात भिनली आहे. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. या दिनाचे अवचित्य साधून तुळापुरात हजारो शंभू भक्तांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी तुळापूर ग्रामस्थ आणि शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने संयुक्तीक पूजा पार पडली. गावचे सरपंच गुंफताई इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले आणि ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिवले तसेच सचिव आणि भाजपा विध्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष आमोल शिवले, माजी उपसरपंच पाणवन खैर, ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय शिवले, माजी सरपंच माउली शिवले, पंचायत सदस्य रामराव शिवले. सुरेख शिवले, राजू शिवले, संतोष शिवले आदी. उपस्थित होते.