लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास मुख्यमंत्र्यांचा होकार

मराठीतील लोकप्रिय अँकर्सना ऐकण्याची पत्रकारांना अनोखी संधी.

पिंपरी । लोकवार्ता-

मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे.. मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती – जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे.. ‘मी अँकर’ हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.. पिंपरी चिंचवड येथील शंकरराव गावडे कामगार भवनात होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, अरूण नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, अनिल बडघुले यांनी केलं आहे..

तसेच राष्ट्रीय अधिवेशनाचे निमंत्रण मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना दिले व त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी -चिंचवड येथे १९ नोव्हेंबर २०२२रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून उद्‌घाटन करावे, यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विभागीय सचिव दिपक कैतके यांनी नुकतीच त्यांची मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली आणि निमंत्रण पत्र दिले. कामात व्यस्त असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी निमंत्रण पत्र वाचून अधिवेशनाला येण्याचे मान्य केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani