चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या लढ्याला अखेर यश
मोशी प्राधिकरणातील सर्व सोसायट्यांच्या मालमत्ता हस्तांतरनाच्या किचकट प्रक्रियेतून होणार सुटका.
मोशी । लोकवार्ता
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारण बरखास्त झाल्यानंतर प्राधिकारणातील सर्व विकसित मालमत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग झालेल्या आहेत .या सर्व वर्ग झालेल्या मालमत्ता, विशेषतः आपल्या सर्व गृहनिर्माण संस्था यांचे सोसायट्यांच्या नावे हस्तांतरण करताना पूर्वीचे सर्व किचकट नियम व हस्तांतरण शुल्क माफ करून, प्रक्रिया सुलभ करावी व सद्या पिंपरी चिंचवड मनपाकडे असणाऱ्या मालमत्ता हस्तांतरण करतानाची जी प्रक्रिया आहे, अशीच प्रक्रिया आता पिंपरी चिंचवड मनपामध्ये वर्ग केलेल्या मालमत्ताना असावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त माननीय श्री.राजेश पाटील साहेब , माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय,यांच्याकडे फेडरेशनने केली होती. हे सर्व करण्यासाठी याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी घेण्यासाठी सकारात्मक प्रस्ताव माननीय आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी राज्यशासनाकडे पाठवला आहे. आणि पुढील दोन महिन्यात महाराष्ट शासनाकडून याचे मंजुरी आदेश मिळतील. अशी माहिती आज माननीय आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी आपल्या फेडरेशन बरोबरच्या मिटिंगमध्ये दिली आहे.

या महत्वाच्या विषयावर पाठपुरावा करण्यासाठी आज आपल्या फेडरेशनची पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त माननीय श्री.राजेश पाटील साहेब यांच्या बरोबर मिटिंग झाली आहे.आपल्या फेडरेशन परिवारातील प्राधिकारणातील सर्व सोसायट्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व प्रलंबित प्रश्न चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून मार्गी लागत आहे.