चिखली-भोसरी बससेवा उदघाट्न सोहळा पार; आजपासून धावणार चिखली-भोसरी PMPML
लोकवार्ता : गेल्या अनेक दिवसांपासून मोशीतील मोशी मार्केट, रिव्हर रेसिडेन्सी, बोऱ्हाडेवाडी येथिक नागरिकांच्या कनेक्टिव्हीटीची समस्या होती. या भागातील नागरिकांना विशेषतः शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिखली-भोसरी अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे. आज या बससेवेचा उदघाटन समारंभ पार पडला.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी महापौर राहुल जाधव, युवानेते निलेश बोराटे आणि निखिल बोऱ्हाडे यांच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या बससेवेचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाची सुरवात जेष्ठ नागरिक कट्टा यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आला. माजी महापौर राहुल जाधव, कार्तिक लांडगे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. हि बससेवा सुरु केल्याबद्दल स्थानिकांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी माजी महापौर राहुल जाधव, कार्तिक लांडगे, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे, सोनम जांभूळकर, आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.