लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

आळंदीत ३२ वर्षानंतर मुलांचे गेटटुगेदर

आमदार महेश लांडगे, पुरुषोत्तम महाराज पाटील यांची भेट

आळंदी । लोकवार्ता-

येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथील सन १९८८ – १९८९ या शैक्षणिक सत्रातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी तब्बल ३२ वर्षानंतर विद्यार्थी ( गेट टुगेदर ) निमित्त एकत्र आले. या निमित्त सर्व विद्यार्थ्यांना अचानक आमदार महेश लांडगे, पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सद्दिच्छा भेट देऊन स्नेहमेळाव्यात उत्साह वाढविला. यावेळी आमदार महेश लांडगे यांचे सह महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या हाहृदयस्पर्शी,मंत्रमुग्ध करणा-या वाणीतून मैत्री या विषयावर आधारित मार्गदर्शन करून उपस्थिताची मने जिंकली. या स्नेह मेळाव्यास डॉ. अरविंद जोशी, डॉ. बालाजी सुरवसे, शिक्षणाधिकारी राणी रंधवे, माजी नगरसेवक राजेंद्र गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गावडे, उद्योजक ज्ञानेश्वर वाघमारे, पोलीस सहायक फौंजदार पंढरीनाथ चाफळे, मच्छिन्द्र सुर्वे, सुनील लष्करे, पत्रकार अर्जुन मेदनकर, मनीषा पिंपरकर, शिल्पा शहा, माधवी रंधवे, संतोष ठाकूर, सुधीर गावडे, शारदा खांडेभराड, ज्योती बोरुंदीया, कर सल्लागार महेश बोरुंदीया, प्रवीण थोरात, सतीश शेलार, संभाजी पगडे, हमीद,शेख, तुकाराम जोगदंड, निशा ठाकूर, मारुती बवले, रामदास गोडसे, शंकर जाचक, जया चोपडा, कांचन गुंजाळ, लीला थोरवे, निशा भंडारी, वैशाली घाडगे, प्रेरणा गांधी,संजय पगडे,प्रमोद बाफना, पुष्पक कुलकर्णी, राजेंद्र भोसले, ज्ञानेश तापकीर, शिवाजी भोसले, सुमन गोपाळे, इंदिरा काळे, विनोद उगले, विश्वनाथ नेटके, कैलास कुऱ्हाडे, कृष्णा शिंदे, सुधीर कुऱ्हाडे, रमाकांत निळे, हनुमंत धायरकर, संपत गावडे आदी उपस्थित होते.  

या संदर्भात सन २०१५ मध्ये शिल्पकला उर्फ राणी रंधवे, जनार्धन सोनवणे यांनी आपल्या वर्ग मित्रांचा एस.डी.व्ही. मैत्री ग्रुप या नावे व्हाट्सअप ग्रुप तयार केला . या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करून सर्वांना एकत्र आणण्याचे प्रभावी काम झाले. त्यांना यासाठी मित्रांची सहकार्य करीत ग्रुप वाढविला. कोवीड १९ मुळे गेट-टुगेदर कार्यक्रम घेण्यासाठी जमले नाही. अनेक वर्षां पासूनची इच्छा प्रत्येक्षात आणण्यास वर्गातील नियोजन करून सुमारे ३२ वर्षानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात मुले-मुली एकत्र येऊन गेट-टुगेदर चा कार्यक्रम यशस्वी केला. यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचा विद्यार्थी परिचय, मनोगत, मार्गदर्शन, गवळण, जुने गीत गायन सादरीकरण, शालेय जीवनातील अनुभव मनमोकळ्या गपा गोष्टी, शालेय जीवनापासून ते आज पर्यंतचा प्रवास, प्रगती, कौटुंबिक माहिती शेअर करीत सर्व मित्रांनी एकमेकांशी संवाद साधला. दुपारी माजी विद्यार्थ्याचे सर्वां समवेत स्नेह भोजन उत्साहात झाले. दरम्यान भारतीय वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी राणी रंधवे आणि अर्जुन मेदनकर यांनी उपस्थित सर्व मित्र, मैत्रिणींना पुस्तके भेट देत संवाद साधला. यावेळी दत्तात्रय म्हस्के यांनी गवळण, मच्छिन्द्र सुर्वे यांनी जुनी गाणी सादर करीत गेटटुगेदर मध्ये उत्साहात रंगात आणली. यावेळी मच्छिन्द्र सुर्वे यांनी गीत गायन केले.यास मोठा प्रतिसाद मिळाला. राणी रंधवे यांचेसह अनेक मित्र-मैत्रिणींनी या वेळी कविता सादर करीत उत्साह वाढविला.
     या गेट टुगेदर मध्ये सहभागी तत्कालीन मित्र- मैत्रिणी माजी विद्यार्थी हे आताचे डॉक्टर, शिक्षक, वकील, उद्योजक, इंजिनियर, डेव्हलपर्स, पत्रकार, शिक्षणाधिकारी,पोलीस अधिकारी, व्यावसायिक,गृहिणी, लेखक,कवी, शासकीय,अशासकीय संस्थेत नोकरी व्यवसाय, व्यापारी, संस्थांचे पदाधिकारी, गुणवंत नागरिक म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाची, देशाची सेवा करीत असल्याने एक यशस्वी बॅच म्हणून ओळखली जाते.    

श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील दहावीच्या १९८९ च्या बॅचचे ग्रेंड गेटटुगेदर तब्बल ३२ वर्षांनंतर आयोजित करण्यात आले. दीर्घ प्रतिक्षे नंतर अविस्मरणीय आणि आनंदात गेटटुगेदर उत्साहात झाले. यासाठी ग्रुप ॲडमीन राणी आणि जनार्धन यांनी परिश्रम घेतले. त्यांना सर्व मित्रांनी सहकार्य केले. दर वर्षी गेट टुगेदर आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प सर्वाना सोबत घेऊन करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपापला परिचय करून देत संवाद साधला. यात शिक्षण, उद्योग,व्यवसाय, छंद, कौटुंबिक माहिती, अनौपचारिक गप्पा, गोष्टी, जुन्या आठवणी, सामूहिक फोटोसेशन, कोल्ड्रिंक, स्नेहभोजन व शेवटी आईस्क्रीम ने गेटटुगेदरचा थंड व गोडसह समारोप पसायदानाने उत्साहात झाला. गेट टुगेदरची  स्नेह मेळाव्याची सांगता सामूहिक पसायदानाने उत्साहात झाली. प्रास्ताविक राणी रंधवे यांनी केले. सूत्रसंचालन जनार्धन सोनवणे, राणी रंधवे यांनी केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani