लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

Chinchwad bypoll Election : भारतीय जनता पार्टीचे जोरदार शक्तीपदर्शन

लोकवार्ता : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी जोरदार शक्तीपदर्शन करीत पदयात्रा काढली. यावेळी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय दिसत होती.

भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), रा.स.प., रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे, निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा महायुतीची वज्रमूठ…

गेल्या काही दिवसांपासून भाजपाची उमेदवारी अश्विनी जगताप की शंकर जगताप यांना मिळणार यावरुन चर्चा रंगली होती. जगताप कुटुंबियांमध्ये दोन गट असल्याचा दावा केला जात होता. मात्र, आज झालेल्या शक्तीप्रदर्शनामध्ये जगताप कुटुंबियांसह भाजपा महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी वज्रमूठ केल्याचे चित्र पहायला मिळाले. अत्यंत उत्साहात पदयात्रा सुरू करण्यात आली. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी पदयात्रेला सुरूवात झाली. गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज 1, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळेसौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, बापुजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ग प्रभाग कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात येणार आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version