Chinchwad bypoll : नाना काटे महाविकास आघाडीतून लढणार
लोकवार्ता : महाविकास आघाडीत चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे, असे त्यांनी म्हंटले. आता राष्ट्रवादीला चिंचवड मतदारसंघ मिळाला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेले नाना काटे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.