Chinchwad bypoll : गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा! अर्ज भरण्यासाठी १० हजारांची चिल्लर घेऊन पोहोचला उमेदवार
लोकवार्ता : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दोन्ही निवडणुकांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे, कारण सगळ्याच पक्षांच्या बंडखोरांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. चिंचवडमध्ये तर एका उमेदवार अर्ज दाखल करताना 10 हजार रुपयांची चिल्लर घेऊन आला.
रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला. गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुरा या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्येही अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं, त्याचीच पुनरावृत्ती चिंचवडमध्ये झाली आहे.