लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आज पासून सुरु.

कोरोनामुळे बंद असलेलं राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आज शुक्रवार पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई। २२ ऑक्टोबर लोकवार्ता –

कोरोनाकाळात राज्यातील चित्रपट गृहे आणि नाट्य गृहे बंद करण्यात आली होती.कोरोनाचा वेग आता मंदावला असून सर्व सामान्य जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने आता हळू हळू कोरोनासाठी लाववण्यात आलेली निर्बंध कमी करण्यास सुरु केली आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आता महाविद्यालय , शाळा, कार्यालये, हॉटेल, प्रेक्षणीय स्थळे लोकल ट्रेन सुरु केले आहे. तसेच राज्यात आज पासून चित्रपट गृहे आणि नाट्य गृहे प्रेक्षकांसाठी सुरु करण्यात आले आहे.

तसेच अम्युझमेंट पार्क देखील आज पासून सूरू होत आहे. या साठी राज्यसरकार ने काही नियम जाहीर केले आहेत. प्रत्येकाने त्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाणून घेऊयात काय आहे नियमावली:-

• ५०% क्षमतेने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु
• दोन लशी घेतलेल्यांलाच प्रवेश
• प्रत्येकाला मास्क ,सॅनिटाईजर आणि सुरक्षित अंतर बंधनकारक
• नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार

https://lokvarta.in/wp-admin/post.php?post=10979&action

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani