मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठूरायाची पूजा संपन्न
बीडच्या नवले दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान.
पंढपूर । लोकवार्ता
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विठुरायालाच्या पूजा हि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निर्विघ्न पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठूरायाची पूजा पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत बीडच्या नवले दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला आहे. गेल्या दोन वर्षानंतर आषाढी वारीचा हा सोहळा निर्विघ्न पार पडला आहे.पंढरपूर मध्ये भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांसमवेत मुख्यमंत्रीनीही ठेका धरला. हाती टाळ घेऊन विठू माउलींच्या भजनात ते दंग झाले. एकनाथ शिंदे हे त्यांच्या परिवारासमवेत सकाळीच पंढरपूर मध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बळीराजासाठी विठुराया कडे साकडे घातले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मागणे घातले.

आज आषाढी वारी मुळे अवघ पंढपूर भाविक भक्तांमुळे दुमदुमलाय.भाविकांच्या टाळ मृदूंगाला भजनाच्या साथीने साक्षात विठ्ठल अवतारल्यासारखे वाटतंय.चंद्रभागेच्या तीरावर भाविकांनी पवित्र स्नानासाठी शासनाकडून सर्व तय्यारी करण्यात आली आहे.