pimapri chinchwad : CNG दारात दोन रुपयांची वाढ
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड मधील सीएनजीच्या दारात दोन रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यामुळे आता एक किलो CNG साठी ८२ रुपये मोजावे लागणार आहेत. मागील काही महिन्यांपासून CNG दारात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. वाढत्या CNG च्या मागणीमुळे गॅसची कमतरता निर्माण होत आहे आणि आयात गॅस महाग झाल्याने CNG च्या दारात सातत्याने वाढ होत आहे.

पुण्यात २८ एप्रिलला मध्यरात्री CNG चा दर ७७. रुपये होता. त्यांनतर २० मे च्या मध्यरात्री हा दार दोन रुपयांनी वाढला. पुन्हा ८ जूनच्या मध्यरात्री पासून दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता CNG साठी चालकाला ८२ रुपये मोजावे लागणार आहेत.