डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वही पेन संकलन.
-रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पिंपरी भीमसृष्टी स्मारक येथे एक वही एक पेन संकलन करण्यात आले.
पिंपरी।लोकवार्ता-
भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना Symbol Of Knowledge म्हणून ओळखले जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला महत्व दिले.त्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिला. ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच विचारावर चालत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पिंपरी भीमसृष्टी स्मारक येथे एक वही एक पेन संकलन करण्यात आले.या उपक्रमास पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त मा.कृष्णप्रकाश सर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी शैक्षणिक साहित्य देऊन सहभागी झाले.तसेच पिंपरी मतदार संघाचे माजी आमदार मा.गौतम चाबुकस्वार पिंपरी महानगरपालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संजय वाबळे सर व माजी नगरसेवक मा. शेखर ओव्हाळ यांनी या उपक्रमास भेट देऊन कार्याचे कौतुक करत उपक्रमात सहभागी होत शैक्षणिक साहित्य दिले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांनी असे मत व्यक्त केले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना व्यक्तिपूजा मान्य नव्हती ते नेहमी विचारांना व शिक्षणाला महत्व देत असत त्यामुळे नागरिकांनी बाबासाहेब यांना फुल हार अर्पण करण्यापेक्षा शैक्षणिक साहित्य पुस्तके दान दिली पाहिजेत ज्यामुळे त्याचा गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी सदुपयोग होऊ शकतो.आणि या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

तसेच रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने असे आवाहन करण्यात आले की जमा झालेले शैक्षणिक साहित्य हे गरीब गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.तरी ज्या गरीब गरजू विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे अश्या विद्यार्थ्यांनी संतोष शिंदे प्रदेश महासचिव यांच्याशी 9604683459 या नंबर वर संपर्क साधावा. यावेळी प्रदेश महासचिव संतोष शिंदे,भोसरी विभाग प्रमुख मयूर जगताप,जैद मोमिन,जय लोखंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते