छपाई व्यवसायाचा बेरंग; सोशल मीडियाने घेतली विवाहपत्रिका, फ्लेक्सची जागा
१०० टक्के नुकसान आहे

लोकवार्त।प्रतिनिधी
पिंपरी : कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. लग्न सोहळ्यावर विविध व्यवसाय अवलबून असून सध्या लग्न सोहळे साध्या पद्धतीने होत आहेत. केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निबंधाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असतानाच, लग्न सोहळे मर्यादित वऱ्हाडीच्या उपस्थितीत करण्याच्या निर्वधामुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. यापूर्वी तीनशे ते एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात होती. मात्र, आता केवळ ५० ते ६० पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे.
टाळेबदीपूर्वी एका लग्न सोहळ्यासाठी तीनशे ते एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाई करण्याची ऑर्डर दिली जात होती. मात्र, लग्नाला उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडीच्या संख्येवर मर्यादा आल्याने अनेक जण समाजमाध्यमांवरून ठराविक वऱ्हाडींना लग्नाचे निमंत्रण देतात त्यामुळे पत्रिकांची छपाई केली जात नाही. त्यामुळे छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कागदावर रंगीबेरंगी कलाकृती तयार करून छपाई करणारा व्यवसाय लॉकडाउनमुळे बेरग झाला आहे. कोरोनामुळे या व्यवसायातील रंगच हरपल्याचे चित्र आहे.
पिंपरीतील अक्षरा प्रिटींगचे गोबन नायर म्हणाले, “लॉकडाऊनपूर्वी एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात होती त्यामुळे २५ ते ३० हजार रुपयाचा व्यावसाय होत होता आता एक ते पाच पत्रिकांची छपाई करुन घेतली जात आहे त्यातून केवळ १०० रुपये मिळत आहेत. म्हणजे १०० टक्के नुकसान आहे शाळा, खासगी ट्यूशन क्लासेस, मदिर, हॉटेल बंद आहेत पत्रक, बॅनर्स छापत होते पण ते ही बंद आहे. दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. शाळा चालू असताना प्रश्न, उत्तरपत्रिका छपाईचे मोठे काम मिळत होते. आता छोटेही काम मिळत नाही.
गुंतवणूक करुन करोडे रुपयांच्या मशिन खरेदी केल्या आहेत. पण, कागा नाही दिवसाला किमान १ हजार रुपयांचे तरी काम होणे आवश्यक आहे. त्यात सरकारचे निर्बध, दुकाने उघडण्याची परवानगी देत नाही प्रिटींग व्यावसायाचे मोठे नुकसान झाले आहे उन्हाळ्यात सात ते आठ कोटी रुपयांचा व्यावसाय बुडाला आहे. छपाई व्यवसाय अडचणीत सापडला आहे अनेकांनी दुकान बंद केले आहेत. सरकारकडून छपाई व्यावसायालाही थोडीही आर्थिक मदत केली नाही आम्ही दुकाने भाडे, कामगारांचा पगार कसा करायचा असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असेही त्यानी सांगितले”.