घरबसून द्या वीजयंत्रणेची तक्रार..महावितरणाची नवीन योजना
-व्हाट्सअप द्वारे देऊ शकता तक्रार.
पिंपरी । लोकवार्ता
थोड्याच दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यामध्ये कित्तेक ठिकाणी वीज खंडित होऊन अनेक नुकसान होत असते.त्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ उडते.आता याचा उपाय म्हणून महावितरणकडून नागरिकांसाठी एक नवीन योजना काढण्यात आली आहे.आता वीज यंत्रणेबाबद काहीही तक्रार असल्यास घर बसल्या व्हाट्सअप द्वारे करू शकता. याच तक्रारींच निवारण लवकरात लवकर महावितरणांकडून करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे .

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३; तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉटस् अॅप मोबाइल क्रमांक ‘महावितरण’ने जाहीर केला आहे. या क्रमांकावर फक्त ‘महावितरण’च्या वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्यास त्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी; तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाइल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.