सदनिका धारकांनी कर न भरल्यास जंगम मालमत्ता जप्त; महानगरपालिकेचा इशारा
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकत कर थकबाकी असलेल्या मिळकत धारकांवर जप्तीची आणि वसुलीची जोरदार मोहिम सुरू केली आहे. डाहरातील निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 4८80 कोटी रूपयांचा थकीत कर आहे. हा कर वसूल करण्यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच थकबाकी असलेलया सदनिका धारकांना कर भरण्यास सांगा, अशा आशयाचे पत्र 100 सोसायट्यांच्या अध्यक्षांना कर आकारणी व कर संकलन विभागाने पाठविले आहे. त्यानंतरही सदनिका धारकांनी कर न भरल्यास नाईलाजाने जंगम मालमत्ता जप्त करण्याचा इशारा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिला आहे.

मिळकतधारकांनी थकीत कर आणि चालू कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 92 हजार मिळकतींची नोंद आहे. महापालिकेच्या 17 विभागीय कार्यालयामार्फत कर संकलानांचे कामकाज केले जाते. गतवर्षी कर संकलन विभागाने 625 कोटी कर वसूल केला होता. यंदा मात्र, कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी 1 हजार कोटी रूपयांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. चाळू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत सुमारे पावणे सहाशे कोटी रूपये कराची वसुली झाली आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, शहरातील (2९1५९) गृहनिर्माण सोसायटीमधील सदनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये एक हजार ते दीड हजार सदनिका धारकांकडे थकबाकी आहे. त्यामुळे संपूर्ण सोसायटीचे नळ कनेक्शन तोडणे जरी कायद्याने योग्य असले. तरी, पालिका प्रशासन अशी कारवाई करणार नाही. मात्र, संबंधित सोसायटीमधील थकबाकीदारांनी पालिकेचा कर भरावा म्हणून सोसायटी अध्यक्ष, सचिवांनी पालिकेला सहकार्य करून संबंधितांना कर भरण्यास सांगावे. थकबाकीदारांची नावे सोसायटी नोटीस बोर्डावर लावावी. त्यानंतरही थकबाकीदार सदनिका धारकांनी कर न भरल्यास सोसायटी अंतर्गत त्यांचे नळजोड तोडण्यासाठी अध्यक्ष, सचिवांना विचारात घेऊन कारवाई करण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात थकबाकी असलेल्या 100 सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना पालिकेने पत्र पाठविले आहे. शहरातील 500 सोसायट्यांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. अध्यक्षांनी संबंधितांना थकीत कर भरण्यास सांगावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी केले आहे. मात्र, त्यानंतरही कर न भरणाऱ्या सदनिका धारकांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.