“अभिनंदन” देशाच्या खऱ्या हिरोला वीरचक्र प्रदान
दिल्लीत एका समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांचा सन्मान करण्यात आला.
दिल्ली।लोकवार्ता-
हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्काराने आज, सोमवारी सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उपस्थिती दर्शवली आहे.

याआधी हवाई दलाने अभिनंदन वर्धमान यांना विंग कमांडरवरुन ग्रुप कॅप्टन अशी बढती दिली आहे. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचा वीर चक्राने सन्मान होणार आहे. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे. शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.