दुषित पाणी पुरवठा : कुंदन गाकवाड यांनी प्रशासनाला फटकारले!
-सह शहर अभियंता प्रवीण लडकर यांना मागणीचे पत्र
– अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले
पिंपरी | लोकवार्ता-
चिखलीमधील गणेशनगर येथे दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या विषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी. यासह पाणी पुरवठ्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी. अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, अशा शब्दांत फ- प्रभाग समितीचे अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी प्रशासनाला फटकारले आहे.

दरम्यान, महापालिका पाणी पुरवठा व जल नि:सारण विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखलीमधील गणेशनगर या परिसरात मुळातच अपुरा व दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्यात आता गेल्या आठ दिवसांपासून दुषित पाणी मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. या संदर्भात महिलांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी मात्र, त्याची दखल घेतली नाही. तसेच अद्याप अधिकारी फिरकलेही नाहीत. दोन तास पाणी वाया जाऊ द्या, नंतर स्वच्छ पाणी येईल, असे सांगत प्रत्यक्ष पाणी व दुरुस्तीकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे. पाण्यासारख्या गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रश्नांवर अशी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी. व स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी कुंदन गायकवाड यांनी केली आहे.