लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

दिल्ली संघात कोरोनाचा शिरकाव; पुण्यातील सामना रद्द

-फिजियो नंतर आणखी एका खेळाडूला कोरोनाचा संसर्ग.

पुणे । लोकवार्ता-

आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे सामने स्थगित करावे लागले होते. यावर्षी मात्र सामने स्थगित न करता कमी खेळाडूंवरही सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान आता दिल्ली टीमला मोठा धक्का बसला आहे इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 30 व्या सामन्यापूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिजिओ पॅट्रिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता संघात आणखी प्रकरणे समोर आली आहेत. दिल्ली कॅम्पमध्ये परदेशी खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सुत्राच्या माहिती नुसार समोर आले. 20 एप्रिलला संघाला पंजाबशी पुढचा सामना खेळायचा जाणारा आहे.(IPL Delhi Capitals Player Tested Covid Positive) आयपीएलमध्ये कोरोनाची प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र चिंता वाढली आहे. दिल्ली संघातील आणखी दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. सुत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार त्यात एक विदेशी खेळाडूही असू शकतो.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या शुक्रवारी टीमचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले होते. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्स आज पुण्याला रवाना होणार होता. परंतु संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या हॉटेलच्या खोलीत विश्रांती घेण्यास सांगितले आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत आहे. सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. जेणेकरून फिजिओ पॅट्रिकची कोरोनाची केस एकटी होती की टीमच्या कॅम्पमध्ये इतर प्रकरणे आहेत हे कळू शकेल.सुत्राच्या माहितीनुसार दिल्लीला पुढील सामन्यासाठी पुण्याला जाण्याचा प्लॅन बदलायाला सांगण्यात आले. आज सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी झाल्यानंतरच संघ आता पुढील सामन्यासाठी रवाना होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली संघाने आपला शेवटचा सामना बेंगळुरूविरुद्ध खेळला आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani