“पिंपरी-चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेल्या दोघांना कोरोना”
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे संकट असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्येही नायजेरिया येथून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी | लोकवार्ता-
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे संकट असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्येही नायजेरिया येथून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दोघांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रोनची लागण झाली आहे की नाही याची चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सध्या जगावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संकट आहे. आतापर्यंत 19 देशात याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान आता राज्यातील जनतेसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. या व्यक्तीला ऑमायक्रॉन या नव्या विषाणूची लागण झालेली आहे की नाही, हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावी लागणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे या व्यक्तीच्या कुटुंबियांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. दरम्यान आता आरोग्य विभागाचे लक्ष हे जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे लागून राहिले आहे.