लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“कोरोना योद्धांना हेलिकॉप्टर राईड”

भोसरी विधानसभेचे आमदार मा. महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे यांचा अनोखा उपक्रम.

पिंपरी।लोकवार्ता-

कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता आपली जबाबदारी चोख सांभाळणार्‍या कोरोना वॉरियरसाठी ‘हेलिकॉप्टरची राइड’ असा अभिनव उपक्रम गुरुवारी भोसरी येथे राबविण्यात आला.सिल्वर ग्रुप, कर्तव्यम सोशल फाउंडेशन व बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे यांच्या वतीने कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित कोरोना योद्ध्यांना हेलिकॉप्टरची सफर या उपक्रमात एकूण 80 व्यक्तींना हेलिकॉप्टरमध्ये राईड देण्यात आली.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील कर्तव्य फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे यांनी कोरोना वॉरियरसाठी ‘हेलिकॉप्टरची राइड’ असा अभिनव उपक्रम गुरुवारी भोसरी येथे राबवला.कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता आपली जबाबदारी चोख सांभाळणार्‍या आणि उत्कृष्ट काम केलेल्या पोलीस बांधव, आरोग्यसेवक, दूध पेपर यांचे वितरण करणारे बांधव, नर्स, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा नागरिकांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला हेलिकॉप्टरची राइड देण्यात आली. अनेकांना या निमित्ताने पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

यावेळी संतोष बारणे म्हणाले समाजात काम करत असताना व्यवसायिक म्हणून आपण काही यश मिळवले असेल, तर नक्कीच हे या समाजानेच आपल्याला दिलेले हे दान आहे असे मी मानतो. समाजाने दिलेले देणे त्यांना परत करावे अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.
संतोष बारणे यांच्यासारखे समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे म्हणूनच मी का काम करु शकतो.


बारणे यांचे खरच वाखाणण्याजोगी आहे त्यांच्यासारखे खंदे सहकारी पाठीराखे माझ्यासोबत आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.-आमदार महेश लांडगे

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani