coronavirus update : पिंपरी चिंचवड शहरात काल दिवसभरात २७३ रुग्ण कोरोनामुक्त
coronavirus

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील २६४ आणि महापालिका हद्दीबाहेरील ६ अशा २७० नवीन रुग्णांची काल नोंद झाली आहे. तर २७३ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा एकूण संख्या २ लाख ५२ हजार २३७ वर पोहचली असून २ लाख ४३ हजार १८८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महापालिका हद्दीतील १२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७ अशा १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले. शहरातील ४ हजार १६३ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ९४७ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत.