चऱ्होलीत विविध विकास योजनेअंतर्गत बांधलेल्या विरंगुळा केंद्र प्रकल्पात भ्रष्टाचार – ॲड. कुणाल तापकीर
-या सर्व विषयावर चौकशीची मागणी कुणाल तापकीर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
चऱ्होली | लोकवार्ता-
मौजे च-होली बु॥ हे गाव सन १९९८ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ठ झालेले गाव असून मनपामार्फत सदर ठिकाणी सन २००२ पासून विविध योजनेअंतर्गत विकास कामे करण्यात आलेली आहेत. तथापि सन २०२१ मध्ये स्थानिकनगरसेवकाच्या चमकोगिरी करिता मनपा अधिका-यांनी नगरसेवकाशी संगनमत करुन च-होली बु॥ गावठाण येथे विरंगुळा केंद्रप्रकल्प उभारलेले असून सदर प्रकल्पात स्थानिक नगरसेवकाने व मनपा अधिका-यांनी भ्रष्टाचार केलेला आहे.असे कुणाल तापकीर यांचे म्हणणे आहे.

भ्रष्टाचाराचे मुद्दे –
१) विरंगुळा केंद्र प्रकल्पाची मनपा मार्फत आरक्षित असलेली जागा ताब्यात न घेता नगरसेवकांच्या सोयीनुसार देवसंस्थान चिंचवड देवस्थानाच्या जागेत सदर प्रकल्प उभारण्यात आलेले आहे. याबाबत चिंचवड देवस्थान यांचेकडील बांधकामासाठी ना हरकत पत्र घेतलेले नाही.
२) विरंगुळा प्रकल्प मा. स्थायी समिती सभा व मा. महानगरपालिका सभामध्ये सदरचा विषय मंजुर न करता परस्पर याबाबतची अंमलबजावणी करणेत आली आहे.
३) विरंगुळा केंद्र प्रकल्पआरक्षित असतानाही याबाबत वेगळे अंदाजपत्रक मंजुर केलेले नसूननिविदा प्रक्रियाहीराबविणेत आलेली नाही.
४) विरंगुळा केंद्र प्रकल्पाचे कामकाज करणेसाठी मनपा व ठेकेदार यांच्या करार झाला नसतानाही सदरचे कामकाज मनपा अधिका-यांनी क्रीडा संकुलचे कामकाज करणा-या ठेकेदाराकडून पूर्ण केले तसेच सदर कामाकरिता झालेला संपूर्ण खर्च क्रीडा संकुल या प्रकल्पातील निधीतुन देण्यात आला.
५) विरंगुळा केंद्र प्रकल्प देव संस्थान, चिंचवड देवस्थान यांच्या मालकीच्या जागेत बांधण्यात आला असून सदर प्रकल्पाचे बांधकाम करणेकामी मनपा बांधकाम परवानगी विभागाची परवानगी न घेता बांधण्यात आलेले आहे. त्यानुसार सदरचे बांधकाम हे अनाधिकृत आहे की मनपाचे असल्याने अधिकृत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
मनपा प्रकल्पाचे कामकाज करणेसाठी महानगरपालिकेमार्फत / शासनामार्फत निश्चित केलेल्या धोरणांचे / नियमांचे उल्लंघन करुन फक्त स्थानिक नगरसेवकाच्या चमकोगिरीकरिता सदर प्रकल्पाचे कामकाज पुर्ण करणेत आले आहे. विरंगुळा केंद्र प्रकल्पाच्या कामामध्ये महापालिका प्रशासनाची व जनसामान्य जनतेची स्थानिक नगरसेवक व मनपा अधिकारी यांनी फसवणूक केलेली आहे. स्थानिक नगरसेवक फक्त प्रकल्पांच्या नव्हे तर च-होलीच्या मनपा कार्यालयातील कामकाजामध्येही सक्रीय असतात मनपा कार्यालयात फक्त त्यांच्या मर्जीतील अधिकारी / कर्मचारी असले पाहिजे ते सांगतील तशीच कामे झाली पाहीजे याबाबतची त्यांची भूमिका असते नियमानुसार कामे करणा-या अधिकारी / कर्मचा-यांची ते बदली करणेस मनपा प्रशासनास भाग पाडतात. तरी या प्रकल्पाची निःपक्षपातीपणे चौकशी करणेत यावी अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख कुणाल तापकीर यांनी केली आहे.