नगरसवेक रवि लांडगे यांच्यासह संजय नेवाळे यांचाही नगरसेवक पदाचा राजीनामा
-आमदारांची मनमानी, हुकूमशाही तसेच भाजपा मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे केले स्पष्ट.
पिंपरी | लोकवार्ता-
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून अजित गव्हाणे यांनी पदभार घेतल्यापासून राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील निदर्शने आणि भाजपा नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरू झाले.भाजपा मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून नगरसवेक रवि लांडगे यांच्यासह संजय नेवाळे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यापूर्वी वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला. भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी थांबविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.रवि लांडगे यांनी पक्ष सोडल्याने आमदार महेश लांडगे आणि भाजपाला मोठा धक्का बसला. सुमारे २२ नगरसेवक भाजपा सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपा सोडणारे बहुतांश नगरसवेक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीची बाजू भक्कम झाली आहे.

रवि लांडगे यांनी भोसरी रुग्नालयाच्या खासगीकरणाचा करार करताना गरवर्षी १७ कोटी रुपये प्रमाणे ३० वर्षांचा करार करून आमदारांनी स्वतःची सोय लावली, असा अत्यंत गंभीर आरोप केला. माया बारणे यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामात ५७ कोटी रुपयांचा गैरव्यवाहर झाल्याचे सांगत भाजपाचा मुखभंग केला. तुषार कामठे यांनी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात १२२ कोटी रुपये काम न करताच उकळल्याचे उघड केले. खुद्द भाजपा नगरसवेकांनीच हे आरोप केल्याने भाजपा त्रस्त आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराल कंटाळून बाहेर पडत असल्याच्या आरोपामुळे खळबळ आहे.
एकीकडे भाजप नगरसेवक राजीनामा देत असल्याने राष्ट्रवादीचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येते.