कोरोनानंतर कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी चक्क २१ लाखांचा खर्च
लोकवार्ता : कोरोनानंतर कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी चक्क २१ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे येथे तयार होणाऱ्या कचऱ्याची स्वतंत्र वाहनांमधून वाहतूक करून विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 या तीन महिन्यांत 21 लाख रुपये खर्च झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर पास्को एन्व्हायरलमेंटल यांच्यामार्फत कोविड कचरा गोळा करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम केले जात आहे. महापालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, लॅबोरेटरीज, क्वारंटाईन सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्स आणि इतर सर्व कोविड कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणाहून पास्को एन्व्हायरलमेंटल याच्यामार्फत कचरा गोळा केला जातो.
पास्को एन्व्हायरलमेंटल हे त्यांच्या वाहनातून या कचऱ्याची वाहतुक करतात. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाचा कचरा गोळा करून वाहतूक करणे आणि विल्हेवाट लावणे, यासाठी जादा खर्च करावा लागत होता. त्यामुळे कचरा निर्मूलनासाठी 100 रुपये प्रतिकिलो व प्रतिसंस्था प्रतिमहा 15 हजार रुपये हे फिक्स चार्जेस वाहतुकीसाठी दर मंजूर केले होते. त्यानंतर मास्क, हॅण्डग्लोज, गॉगल, ड्रेस, शिल्ड असे संपूर्ण पीपीई किट, सॅनिटायझरचे दर नियंत्रणात आले.
त्यामुळे त्यांनी 100 रुपये प्रतिकिलो या दराऐवजी प्रतिकिलो 87 रुपये वाहतूक व निर्मूलन खर्चासह देण्यात यावे, अशी विनंती केली आहे. कोरोना कचरा निर्मूलनासाठी 87 रुपये प्रतिकिलो दरानुसार तीन महिन्यांसाठी 24 हजार 120 किली कचरा वाहतुकीसाठी 20 लाख 98 हजार रुपये खर्च झाला आहे.