वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण संपन्न
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पुढाकार

लोकवार्ता|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या सौजन्याने आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर येथे कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहीम चे वकिलांसाठी आयोजन करण्यात आले, त्या मध्ये २७० वकिल व पिंपरी न्यायालयिन कर्मचारी यांनी समभाग नोंदवला.

सदर लसीकरण कार्यक्रम घेण्यासाठी आतिरिक्त आयुक्त श्री.विकास ढेकणे,उपायुक्त कायदे विभाग श्री.चंद्रकांत इंदलकर,वरिष्ठ वैद्यकिय आधिकारी डॅा.वर्षा डांगे,तसेच डॅा.पवन साळवे यांच्याकडे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ,सचिव ॲड महेश टेमगिरे,ॲाडिटर ॲड धनंजय कोकणे व महाराष्ट्र आणि गोवा शिस्तपालन समिती सदस्य ॲड अतिश लांडगे यांनी वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरवठा केला.

कार्यक्रमाचे उदघाटन पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश प्रमुख मा सुपेकर साहेब व न्यायाधिश मा.पठाण साहेब, अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ व वैद्यकिय अधिकारी डॅा. तृप्ती सांगळे मॅडम यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास विशेष उपस्थिती पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे चे माजी अध्यक्ष ॲड सुभाष चिंचवडे,ॲड संजय दातीर पाटिल,ॲड सुशील मंचरकर,ॲड राजेश पुणेकर, ॲड सुनील कडुसकर, ॲड दिनकर बारणे उपस्थिती होते.
तर कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे,सचिव ॲड महेश टेमगिरे,सह सचिव ॲड अनिल शिंदे,खजिनदार ॲड हरिष भोसुरे,ॲाडिटर ॲड धंनजय कोकणे,सदस्य ॲड ऋतुराज अल्हाट,ॲड मंगेश नढे,ॲड प्राची शितोळे,ॲड कृष्णा वाघमारे, ॲड. मंगेश भोईर यांनी केले.
सदर लसीकरण कार्यक्रम व्यवस्थीत रित्या पार पाडल्यामुळे सर्व वैद्यकिय अधिकारी व पालिका कर्मचारी यांचे अध्यक्ष ॲड गोरखनाथ झोळ व कमिटी यांनी आभार मानले.