पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना वाढतोय ; सक्रिय रूग्णसंख्या १०५ वर
शहरात सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा १०५ वर गेला आहे. मार्च महिन्यात हा आकडा ११३ वर होता तर १४ मार्च नंतर रुग्णसंख्येत घट झाली होती.

लोकवार्ता : पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कोरोनानाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झालं आहे. आता शहरात सर्वत्र चाचण्या वाढवल्याने एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा १०५ वर गेला आहे. मार्च महिन्यात हा आकडा ११३ वर होता तर १४ मार्च नंतर रुग्णसंख्येत घट झाली होती. आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्यानं प्रशासनाने हालचाली वाढवत सर्वत्र चाचण्या सुरु केल्या आहेत.
पुन्हा एकदा कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सावध झाले आहे. या महिन्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा शासनामार्फत देण्यात आला आहे. महापालिकेने तपासणी व लसीकरणावर भर दिला आहे. १ जून ला ९ रुग्ण, २ जून ३, ३ जून ९, ४ जून २७, ५ जून १८ आणि ६ जून १९ रुग्णसंख्या आढळली आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या १०५ वर पोहोचली आहे.