नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण
वृक्षारोपण, १००० तुळस रोपांचे वाटप तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी मोबाईल अँप सुविधा उपलब्ध

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : (दि. १२ जून): नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विधायक सामाजिक कामांच्या माध्यमातून विविध उपक्रम शनिवार दि. १२ जून रोजी संत तुकाराम नगर येथे राबविण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांसोबतच इतर सर्व रुग्णांना तात्काळ उपलब्ध होईल अशी रुग्णवाहिका अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने लोकार्पित करण्यात आली. प्रभाग क्रमांक २० मधील सर्व गरजू नागरिकांसाठी हि रुग्णवाहिका सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाकाळात सर्वांनाच ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला म्ह्णूनच निसर्गाच्या माध्यमातून मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनचे महत्व सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे या भावनेतून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी वृक्षारोपण सोहळा आयोजित केला व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली. सोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांना फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल असे आयडियल स्टडी अँप मोफत उपलब्ध करून देण्यात आले. दहावीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हे अँप सर्व विषयांसाठी फायदेशीर आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्य वर्धापन दिनानिमित्त एक हजार तुळस रोपांचे वाटप रविवार दि. १३ जून रोजी संत तुकाराम नगर व परिसरातील घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. वाढदिवसाचा नाहक खर्च टाळून विधायक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नगरसेविका शिलवंत यांचे अभिनंदन केले.

यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी महापौर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, नगरसेविका माई काटे, माजी नगरसेविका स्मिता कुलकर्णी, मा. नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, गोरक्ष लोखंडे, शेखर काटे, अक्षय माचरे, डॉ. पूजा कुलकर्णी, अमित भोसले, सविता नानेकर, विजय गायवाड, आर जी गायकवाड, राजेश वाबळे,अभिजित गोफण, सत्यसेन शिरसाठे, शाम सिंग, सतीश गायकवाड, शाम घोडके, ॲड. राजरत्न शिलवंत, सोना प्रधान, सचिन लाड, रवींद्र इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.