भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पडला पार.
पिंपरी | लोकवार्ता-
पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला गती येण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या नळस्टॉप येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या सह पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ई-व्हेईकलवरुन या उड्डाणपुलावरून प्रवास केला. हा पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल असून या पुलाच्या संकल्पापासून तर सिद्धीपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका निभावता आली, याचे मोठे समाधान आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्यावर असताना जयपूर येथील दुमजली पुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना मांडून त्याची पूर्ती होईपर्यंत पाठपुरवा करता आला असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले . या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल कुमार, भाजप शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वासंतिक जाधव, हर्षाली माथवड, भाजप कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, मेट्रोचे अतुल गाडगीळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
