लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेवर बिनविरोध निवड

-शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे ।लोकवार्ता-

पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली. बॅंकेच्या इतिहासात प्रथमच अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह बँकेच्या सर्व विद्यमान संचालकांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भाजपनं जवळपास सर्वच जागांवर अर्ज भरले असून राष्ट्रवादी काँग्रेसपुढं आव्हान उभं केलं आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल २९९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर दहा जणांचे अर्ज बाद झाले. तर दहा जणांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतीशराव काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळं अजितदादांची बिनविरोध निवड झाली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे व संजय जगताप यांची याआधीच बिनविरोधी निवड झाली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani