लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

दसरा मेळाव्यासंबंधी संजय राऊत यांचं मोठं विधान

कोरोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार

लोकवार्ता । प्रतिनिधी

दरवर्षी होणारा शिवसेनेचा बहुचर्चित दसरा मेळावा गेल्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली पार पडला. यंदाही कोरोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच त्यांनी या मेळाव्याच्या स्वरुपाविषयीही वक्तव्य केलं आहे. शिवसैनिकांमध्ये त्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण होणार हे निश्चित.

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना दसरा मेळावा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani