आळंदी मंदिरात साकारला चंदन उटीतून नृसिंह अवतार
लोकवार्ता : आळंदी मंदिरात चंदन उटीतून नृसिंह अवतार साकारला आहे. काल श्री नृसिंह जयंती होती. या निम्मिताने श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदन उटीतून नृसिंह अवतारातील वैभवी रूप साकारण्यात आले होते.

आळंदी मंदिरात चंदन उटीतून नृसिंह अवतार साकारला आहे. काल श्री नृसिंह जयंती होती. या निम्मिताने श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदन उटीतून नृसिंह अवतारातील वैभवी रूप साकारण्यात आले होते.
हे रूप पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. काल आळंदीतील श्री नृसिंह महाराज मठात जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंपरेनुसार श्री स्वामी महाराज यांचे संजीवन समाधीवर श्री क्षेत्रपाध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, सुधीर गांधी, नितीन गांधी, मुकुंद गांधी परिवाराने श्रींची वैभवी आणि लक्षवेधी चंदन उटी श्री नृसिंह अवतार स्वामी महाराज मठात साकारली.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांच्या प्रथेप्रमाणे मंदिरात नृसिंह जयंतीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले होते. नृसिंह जयंतीनिमित्त जन्मोत्सव पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. याप्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेंच्या वतीने जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा पार पडली. यावेळी मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली.