मी पुन्हा येईन म्हणणारे…खरंच पुन्हा येतील का ?
-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु.
पुणे । लोकवार्ता
गेल्या दोन दिवसांपासून राजकारणात मोठ्या हालचाली सुरु झालेल्या आहे. यातच शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंडखोरी केल्याचे समोर आले आहे.एकनाथ शिंदे हे भाजपच्या समर्थानात असून मुख्यमंत्र्यांना देखील भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता भाजपातर्फे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासोबत 37 आमदार असणे घटनेनुसार गरजेचे आहे. येथे तीन आमदार अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाने एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत बहुमताचा आकडा गाठल्यास भाजपाला सत्तास्थापन करता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना राज्यपालांसमोर या सर्व आमदारांचे पत्र ठेवावे लागणार आहे.